Thursday 22 April 2021

पुनर्स्थापित - २

शब्द हे विणून वाणी
शब्द हे विंचू चावी
कुणा कुणा, शब्द नाही
कुणी कुणी शब्दातून पाही
मला शब्द हे कविता झाली
तुला शब्द ते अनोळखी राही
शब्दांसाठी शब्दे
शब्दांच्या शोधात शब्द मिटले
राहिला फ़क्त श्वास
श्वासांच्या ध्वनित शब्द प्रेमाचे मिटले
ध्वनी होते हताश , पण तू मुग्ध होती
अभिमानाच्या शब्दांत
तर शब्द हे कविता झाली
तुला शब्द ते अनोळखी राही
प्रेम शब्दांत न कळे, 
प्रेमाचे धडे शब्दांत नाही खरें
तर, जरी
कुणा कुणा, शब्द नाही
कुणी कुणी शब्दातून पाही
शब्द हे विणून वाणी
शब्द हे विंचू चावी।

No comments:

Post a Comment