फुटे न फुले
जगणं हे ऎसे व्हावे
निवांत, निषचिंत, शांतता राखून
अरुंद मनात , येति ना खरे
शब्द, व्याकरण, प्रेमळ भाव
खोटी व्यक्तिमत्वाचे धडे
बघुन बोलून नापून शिकलो
तरीही अल्लड मनाचे रडे
गरज नाही
तरी पाहिजेचा रोडा
त्यावर आपली मतिमंदत्व
आणत नाही, कुणास चैन
म्हणून काळज हवी दगडी
करण दगडी काळजात
फुटे न फुले
जगणं हे कैसे व्हावे
निवांत, निश्चिंत, शांतता राखून
No comments:
Post a Comment